Thursday, October 20, 2022

फटाके की पुस्तके निवडायची

*काय निवडायचं ?*

*फटाके* 💥की *पुस्तके* 📚 

*फटाके* मोठा आवाज ⚡करतात.
*पुस्तके* शांतपणे हळूवार भेटतात.

*फटाके* हवेचं प्रदूषण 🙊करतात.
*पुस्तके* वैचारिक प्रदूषण दूर करतात.

*फटाके* अक्षरशः पैसे 💵जाळतात.
*पुस्तके* मात्र पैसे 💰उभे करतात.

*फटाके* लहानग्यांना इजा 🤕करतात 
*पुस्तके* बाळांना 👶🏻छान रमवतात 

*फटाके* पक्षीप्राण्यांना 🐥घाबरवतात 
*पुस्तके* 📖सर्व माहिती पोहोचवतात 

*फटाके* कान किर्रर करुन सोडतात. 
*पुस्तके* मानसिक समाधान 💆🏻‍♂देतात.

*फटाके* माणसाचा अहंकार कुरवाळतात.
*पुस्तके* माणसाला जमिनीवर ठेवतात.

*फटाके* विध्वंसक मूल्य 🔥रुजवतात.
*पुस्तके* रचनेचा ♻आग्रह धरतात.

*फटाके* क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.
*पुस्तके* तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.

*फटाके* म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.
*पुस्तके* म्हणजे बालबुद्धीला आवाहन.

*फटाके* ही तर खरीखुरी विकृती.
*पुस्तके*च उभी करती मानवी संस्कृती.

भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा 
फटाक्यास फाटा देवूनि *पुस्तकेच* वाटा 

*आता काय निवडायचं*
तुम्हीच ठरवा !
*विवेकाचा आवाज बुलंद करुया*📢

Wednesday, October 19, 2022

कालची उत्तर

आपल्या मराठीच्या ज्ञानाची चाचणी… आणि पर्यायाने ज्ञानात भर…..


१. हत्ती – गज
२. पंकज- कमळ
३. तोंड – वदन
४. पाणी – जल
५. नमस्कार – नमन
६. बाप – जनक
७. बाण –शर 
८. बाग – उपवन
९. समस्या – अडचण
१०.घास--कवल
११.धाक – भय
१२.भांडण – कलह
१३.नवरा – वर 
१४.पर्वत – अचल
१५.कठीण – अवघड
१६.पुरुष – नर
१७.द्रव्य – धन
१८.आवश्यकता – गरज
१९.उलगडा- उकल
२०.दूध – पय
२१.रूची- चव
२२.गंध – दरवळ
२३.गृह – घर
२४.घोडा – हय
२५.पाऊल – पद
२६.डोळा – नयन
२७.तृण – गवत
२८.रस्ता – पथ
२९.हात – कर
३०.वारा- पवन
३१.सुवर्ण – कनक
३२ अंबर – नभ
३३.खून – वण
३४.रास --थर
३५.कप्पा – खण
३६.पक्षी – खग
३७.किल्ला – गड
३८.अवचित – एकदम 
३९. मृत्यू – मरण
४०.अग्नि – अनल
४१.काळ – समय
४२.जंगल – नव
४३.अविरत – सतत
४४.आश्चर्य – नवल
४५.अभिनेता- नट 
४६.ढग – घन
४७.पोट- उदर
४८.अंधार- तम
४९.ध्वनि – रव
५०.ओझे – वजन

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, October 18, 2022

मराठी कोडं आज रात्री नऊ वाजेपर्यंत उत्तर द्या

आपल्या मराठीच्या ज्ञानाची चाचणी… आणि पर्यायाने ज्ञानात भर…..
खाली दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे
कुठलाही काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले उत्तर असावे

१. हत्ती –
२. पंकज-
३. तोंड –
४. पाणी –
५. नमस्कार –
६. बाप –
७. बाण –
८. बाग –
९. समस्या –
१०.घास –
११.धाक –
१२.भांडण –
१३.नवरा –
१४.पर्वत –
१५.कठीण –
१६.पुरुष –
१७.द्रव्य –
१८.आवश्यकता –
१९.उलगडा-
२०.दूध –
२१.रूची-
२२.गंध –
२३.गृह –
२४.घोडा –
२५.पाऊल –
२६.डोळा –
२७.तृण –
२८.रस्ता –
२९.हात –
३०.वारा-
३१.सुवर्ण –
३२ अंबर –
३३.खून –
३४.रास –
३५.कप्पा –
३६.पक्षी –
३७.किल्ला –
३८.अवचित –
३९. मृत्यू –
४०.अग्नि –
४१.काळ –
४२.जंगल –
४३.अविरत –
४४.आश्चर्य –
४५.अभिनेता-
४६.ढग –
४७.पोट-
४८.अंधार-
४९.ध्वनि –
५०.ओझे –

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, October 14, 2022

15 October Dinvishesh


 ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती :

यश म्हणजे काय ते व तुमची सही किंवा सिग्नेचर न राहता ती एक ऑटोग्राफ झालेली असते ही सुप्रसिद्ध आणि प्रेरणादायी वाक्य आहेत आपल्या गरीब कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून वर्तमानपत्र विकणारा एक तरुण  मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधल्या रामेश्वरम येथे एका तामिळ मुस्लिम परिवारात त्यांचा जन्म झाला.हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले
भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. १९७४मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर ही पहिलीच चाचणी होती.कलाम यांची २००२मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन विरोधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना "पीपल्स प्रेसिडेंट" (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते. राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना कलाम कोसळले आणि २७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसह हजारो लोक त्यांच्या गावी रामेश्वरम येथे आयोजित अंत्यसंस्कार समारंभास उपस्थित होते, जिथे त्यांना पूर्ण राज्य सन्मानाने दफन करण्यात आले.

Thursday, October 13, 2022

१४ ऑक्टोबर २०२२ दिनविशेष


१९४८: साली इजरायल आणि मिस्र देशामध्ये भीषण युद्ध सु(ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.

१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला

१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले

१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

२०१०: साली राजधानी दिल्ली येथे आयोजित १९ व्या राष्ट्रमंडळ खेळांची सांगता झाली.

माय मराठी  विषय - मायबोली  माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...