Posts

Showing posts from September, 2020

बातम्या

Image

बातम्या

  दि.21 .09. 2020 *राष्ट्रीय सौर*  *दि 30 भद्र 1942* सोमवार ============= ★★  : :  अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील दिवसांमध्ये व्हाईट हाऊस आणि काही विभागांना रिझिन्स नावाच्या घातक रसायनांचा समावेश असलेले लिफाफे पाठवले गेले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की- काही अन्य धोकादायक रासायनिक लिफाफेही व्हाईट हाऊस किंवा इतर विभागांकडे पाठविण्यात आले आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. हा डावपेच रचण्यासाठी स्थानिक टपाल यंत्रणेचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांना वाटत आहे.न्यूयॉर्क टाइम्स नुसार, तपास यंत्रणेला संशय आहे की, हे लिफाफे कॅनडावरुन पाठवण्यात आले आहेत. एका महिलेवर यंत्रणेला संशय आहे. तिचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. ★★  : :  राज्यसभेत केंद्र सरकारने शेतीसंबंधीत दोन बिल फार्म अँड प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) बिल आणि फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोडक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्व्हिस बिल ध्वनी मताने मंजूर केले आहे.वोटिंग दरम्यान सदनात मोठा गदारोळ झाला. विरोधी खासदारांनी वेलमध्ये जाऊ

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

Image
  एम.एस. सुब्बुलक्ष्मी एम.एस. सुब्बुलक्ष्मी आयुष्य जन्म १६ सप्टेंबर ,  इ.स. १९१६ जन्म स्थान मदुरै मृत्यू ११ डिसेंबर ,  इ.स. २००४ मृत्यू स्थान चेन्नई ,  तमिळनाडू संगीत साधना गायन प्रकार कर्नाटक संगीत संगीत कारकीर्द कारकिर्दीचा काळ इ.स. १९३०-२००४ गौरव पुरस्कार पद्मभूषण  (इ.स. १९५४),  मॅगसेसे पुरस्कार  (इ.स. १९७४),  पद्मविभूषण  (इ.स. १९७५)  भारतरत्‍न  (इ.स. १९९८) कुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या , सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. सहाव्या इयत्तेत असतानाच शिक्षकांनी मार दिल्यामुळे सुब्बलक्ष्मी यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅसेटचे उदघाटन केले. त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार असलेल्या त्यागराजन यांच्याशी त्या १९४० साली विवाहबद्ध झाल्या. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णवि

१७ सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती संग्रामदिन

Image
  विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम! आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं – मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि त्यातील – ७८ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत. 1) औरंगाबाद 2) नांदेड 3) परभणी 4) बीड 5) जालना 6) लातूर 7) उस्मानाबाद व 8) हिंगोली     दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे. यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात. मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी – पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्

विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम September 15, 2020

Image
  सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम :  ( १५ सप्टेंबर १८६१-१४ एप्रिल १९६२). प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे.  त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.   विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले. स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियु

ईश्वरचंद्र विद्यासागर September 15, 2020

Image
  विद्यासागर, ईश्वरचंद्र :  (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले. ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षणखात्यात साध्या शिक्षकापासून (Fort William College, १८४१) ते शिक्षणनिरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत (१८५४—५८) काम केले. सरकारी शिक्षणखात्यात असताना शिक्षणखात्यातर्फे मुली शिकल्या पाहिजेत, या हेतूने

गिजुभाई बधेका September 15, 2020

Image
बधेका, गिजुभाई (Badheka, Gijubhai) :  (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे झाला. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. १९०५ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी सामळदास महाविद्यालयामध्ये गिजुभाईंचे नाव दाखल केले; परंतु तेथील अभ्यासक्रम पुरा न करताच त्यांनी महाविद्यालय सोडले व उपजीविकेसाठी २०१७ मध्ये आफ्रिकेस प्रयाण केले आणि तेथील सॉलिलीटरच्या कमपनीत काम केले. तेथील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर १९१० साली ते भारतात परतले. त्यांनी आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित अशी प्रवासवर्णने लिहिली. भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व १९११ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पतकरली. कालांतराने ते त्या संस्थेत प्राचार्य झाले

Ozone day information September 15, 2020

https://youtu.be/rKx09w-7PIk  

समावेशक शिक्षण September 14, 2020

Image
समावेशक शिक्षण  भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात. हे शिक्षण ‘समान संधी’ तत्त्वावर आधारलेले असून या शिक्षणपद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो. इतिहास :  १९६० मध्ये ‘सर्वांसाठी शिक्षणʼ (Education for all) ही संकल्पना जगातील अनेक देशांत अस्तित्वात आली होती. या संकल्पनेस हळुहळु चालना मिळून तिचा १९८१ च्या काळात प्रसार होऊ लागला. १९९० मध्ये सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेतून ‘समावेशक शिक्षणʼ या संकल्पनेचा उदय झाला. १९९४ मध्ये भारतासह एकूण ९२ देशांनी आणि २५ शैक्षणिक संघंटनांनी संकल्पनेस मान्यता दिली व स्वीकारली आहे. १९९९ मध्ये युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization : UNESCO) या संस्थेने नियमित शाळेतील भिन्न मुलांच्या गरजांनुसार सर्वांसाठी अध्यापन कार्यनीती विकसीत करावी, असे सुचविले. युनेस्कोच्या मते, ‘वंचित बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजांचा शोध घेत लक्ष केंद्रित करणारा विकासात्मक उपागम म्हणजे समावेशक शिक्षणʼ. समाव

फ्रीड्रिख फ्रबेल September 14, 2020

Image
  फ्रबेल, फ्रीड्रिख :  (२१ एप्रिल १७८२–२१ जून १८५२). जर्मन शिक्षणतज्ज्ञ व बालोद्यान शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म ओबरव्हाइसबाख (थुरिंजिया) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव फ्रीड्रिख विल्हेल्म ऑगस्ट फ्रबेल होय. त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे रीतसर प्राथमिक शिक्षण घेता आले नाही. पंधराव्या वर्षी त्यांना एका वनव्यावसायिकाकडे उमेदवार म्हणून दोन वर्षांसाठी ठेवण्यात आले. या दोन वर्षांच्या काळात प्राणी व वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची संधी त्यांना लाभली. फ्रबेल हे सतरा वर्षांचे असताना येना विद्यापीठात शिकत असलेल्या आपल्या वडीलभावाला भेटण्यास गेले आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेने ते विद्यापीठात दाखल झाले. आर्थिक अडचणींमुळे वर्षभरातच त्यांना शिक्षण सोडावे लागले; त्याचबरोबर शिक्षणासाठी कर्ज घेतले असता ती कर्जफेड न झाल्याने त्यांना थोडे दिवस तुरुंगातही जावे लागले. नंतरच्या चार वर्षांत त्यांनी अनेक प्रकारची कामे केली; पण कशातही त्यांचे मन रमले नाही. १८०५ साली फ्रँकफुर्ट येथे वास्तुकलेचा अभ्यास करीत असताना फ्रबेल यांची  योहान हाइन्‍रिक पेस्टालॉत्सी (Johann Heinrich Pestalozzi)  या स्विस शिक्षणतज्ज