Posts

Showing posts from February, 2025
Image
माय मराठी  विषय - मायबोली  माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, भाव मनातील मांडता मनोमनी ती रुजते. माझ्या भाषेची गोडी आहे अमृताहुन गोड सहज भिडते मनाला नाही कूणाला तोड कधी होते ती कठोर तापलेल्या लोहा परी, कधी होते मृदू छान मऊ मऊ लोण्या परी. किती वर्णावी थोरवी माझ्या बोली भाषेची, दुर देशी पोहोचली ओवी माझ्या  हो बोलीची. कधी दरवळते सुगंधाने पारिजातक फुलावानी, नाही दुजा भाव तिला  बहरते ती  मनोमनी.