विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम! आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं – मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि त्यातील – ७८ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत. 1) औरंगाबाद 2) नांदेड 3) परभणी 4) बीड 5) जालना 6) लातूर 7) उस्मानाबाद व 8) हिंगोली दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे. यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात. मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी – पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारत...