बातम्या

 दि.21 .09. 2020

*राष्ट्रीय सौर* 
*दि 30 भद्र 1942*
सोमवार
=============


★★  : :  अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील दिवसांमध्ये व्हाईट हाऊस आणि काही विभागांना रिझिन्स नावाच्या घातक रसायनांचा समावेश असलेले लिफाफे पाठवले गेले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की- काही अन्य धोकादायक रासायनिक लिफाफेही व्हाईट हाऊस किंवा इतर विभागांकडे पाठविण्यात आले आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. हा डावपेच रचण्यासाठी स्थानिक टपाल यंत्रणेचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांना वाटत आहे.न्यूयॉर्क टाइम्स नुसार, तपास यंत्रणेला संशय आहे की, हे लिफाफे कॅनडावरुन पाठवण्यात आले आहेत. एका महिलेवर यंत्रणेला संशय आहे. तिचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

★★  : :  राज्यसभेत केंद्र सरकारने शेतीसंबंधीत दोन बिल फार्म अँड प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) बिल आणि फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोडक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्व्हिस बिल ध्वनी मताने मंजूर केले आहे.वोटिंग दरम्यान सदनात मोठा गदारोळ झाला. विरोधी खासदारांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. तृणूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापति हरिवंश यांचा माइक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहाचे नियम पुस्तक फाडले. सभागृहाची कार्यवाही सुरू ठेवण्यासाठी मार्शलला बोलवावे लागले. दहा मिनिटां साठी सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि गदारोळात सरकारने दोन्ही बिले मंजूर केली.

★★  : :  विरोधकांचा विरोध डावलत कृषि विषयक विधेयके आज राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्र, करोना काळातही  पंजाब - हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयका विरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलंय. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी 'रस्ता रोको' आंदोलन करत महामार्ग ठप्प करून टाकलेत. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी अंबालाच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. ट्रॅक्टर सहीत रस्त्यावर आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय. अनेक आंदोलन कर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा विरोध केलाय.

★★  : : *कृषी विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन सुरू असलेला गदारोळ संपलेला नाही. या विधेयकांच्या मंजुरी वेळी उपसभापती हरिवंशसिंह यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे*.

★★  : :  लडाख मध्ये भारत आणि चीन मध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर ( LoC ) ३००० अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. विशेष करून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी हे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती नियंत्रण रेषेवरील उच्च सरकारी सूत्रांनी दिलीय.

★★  : :  उत्तर प्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. ही फिल्म सिटी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात येणार आहे.  लखनऊ मध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उच्च अधिकाऱ्यां सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सध्याच्या स्थितीत देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार असून त्यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस वे चं क्षेत्र अधिक चांगलं असल्याचंही ते म्हणाले. या फिल्मसिटी मुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसंच रोजगाराच्या दृष्टीनेही अत्यंत उपयोगी प्रयत्य ठरेल. यासाठी त्यांनी जागेसाठी पर्याय उपलब्ध करुन लवकरात लवकर कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. 

★★  : :  दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास चीन साठी हेरगिरी करण्या वरून अटक केली आहे. या पत्रकारा बरोबरच एक महिला व अन्य एक पुरूषास देखील पोलिसांनी अटक केली आहे.दिल्ली मधील  राजीव शर्मा मुक्त पत्रकार (फ्रिलान्स जर्नलिस्ट) आहेत. राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी निगडीत अनेक गोपनीय कागदपत्रं हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्मा यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी अॅक्ट) अटक करून, पुढील तपास सुरू केला आहे. सध्या न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

★★  : :   आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासना द्वारे करण्यात आलेल्या उपायां व्यतिरक्त असेल

★★  : :    राज्यसभेत  महामारी रोग विधेयक (संशोधक) विधेयक 2020 पास झाले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संसदेत हे विधेयक पास केले. या विधेयकात महामारीदरम्यान देशात डॉक्टर्स, नर्स, आशा कार्यकर्त्यांची सुरक्षा, तर हल्ला करणाऱ्यावर शिक्षा देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारने 123 वर्ष जुन्या कायद्यात बदल केला आहे. याअंतर्गत डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांना जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. हल्लेखोरांना 50 हजार ते 2 लाख दंड करण्याची तरतूद आहे. याशिवाय 3 महिन्यांपासून 5 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते. गंभीर दुखापत झाल्यास जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. हा अजामीन पात्र गुन्हा असेल.

★★  : :  तेलंगणा विधानसभेने ‘तेलंगणा स्टेट बिल्डींग परमिशन अप्रुवल अॅण्ड सेल्फ सर्टिफिकेशन सिस्टम अर्थातच टीएस- बीपीएएसएस विधेयक मंजूर केले आहे.  सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व नगरपालिका आणि जीएचएमसी मध्ये  या विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येईल. या नव्याने मंजूर केलेल्या विधेयका नुसार, ७५ चौरस यार्ड पेक्षा कमी भूखंडासाठी आणि ७ मीटर पर्यंतच्या इमारतीं साठी परवानगीची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे ७५ ते ६०० चौरस यार्ड मापाच्या भूखंडात बांधकाम करण्यासाठी नागरिक सेल्फ सर्टीफिकेशन द्वारे परवानगी घेऊ शकतात. त्याच बरोबर ६०० चौरस यार्ड पेक्षा मोठ्या आकाराच्या भूखंडा साठी आणि १० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या सर्व लेआउटची मंजूरी एकाच ठिकाणी देण्यात येईल.

★★  : :  केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी लोकसभेत 2 हजार रुपयांच्या नोटेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली. अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितलं की, 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लोकसभेत लेखी उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं की, सरकार कोणत्याही चलनातील नोटेबद्दल निर्णय घेण्याआधी आरबीआयचा सल्ला घेते. यामध्ये सर्वासामान्यांसाठी पुरेशा नोटा उपलब्ध करून देण्याचा समावेश असतो.आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये प्रेसकडे 2 हजारांच्या नोटा छापण्यासाठी कोणतंही मागणीपत्र पाठवण्यात आलं नव्हतं.मात्र याचा अर्थ असा नाही की सरकार 2 हजाराच्या नोटेची छपाई बंद करण्याचा विचार करत आहे. यावरून आता हे स्पष्ट होत आहे की नोट बंद होणार अशा अफवा आहेत.

★★  : :  काेराेनावर बहुप्रतिक्षेत असलेली लस ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असून त्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सोमवारपासून पुण्यातील ससून रुग्णालयात सुरुवात हाेणार आहे. ससून रुग्णालयाने त्यादृष्टीने लसची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना नावनाेंदणी करण्यास सांगितले आहे.

★★  : :  पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
 २३ सप्टेंबरला ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश यांसह इतर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी, ११ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत, त्या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचनाही केल्या होत्या.

★★  : :  कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम केले आहे. आमचे पोलीस जरूर थकले आहेत. पण हिम्मत हरलेले नाहीत. या काळात कर्तव्य निभावताना 208 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या कुटुंबाला 65 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली. 

★★  : : चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) ने आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या ओपनिंग मॅचमध्ये मुंबई इंडियंसला 5 विकेट्सने पराभूत केले. अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 162 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या सीएसकेने 19.2 ओव्हरमध्येच 5 विकेट्स गमावून 166 धावा करत सामना आपल्या नावे केला. 

★★  : :  युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये राेहमर्षक विजयाची नाेंद केली. दिल्लीने आपल्या पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर विजय संपादन केला. यंदाच्या लीगमधील हा पहिला सुपर आेव्हरमधील विजय ठरला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघानेही ८ गड्यांच्या माेबदल्यात १५७ धावा काढून सामना टाय केला. सामन्याचा निकाल सुपर आेव्हरमध्ये लावण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

फटाके की पुस्तके निवडायची

23 सप्टेंबर दिनविशेष