शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
साळुंखे, गोविंदराव ज्ञानोजीराव : (९ जून १९१९–८ ऑगस्ट १९८७). महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी. ‘बापूजी’ या नावाने परिचित. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर हे त्यांचे मूळ गाव. ज्ञानोजीराव आणि तानुबाई या दांपत्याचा गोविंद हा सर्वांत धाकटा मुलगा. बालपणीच ते मातृसुखाला आणि बारा वर्षांचे असताना पितृसुखाला मुकले. बापूजी यांचे प्राथमिक शिक्षण रामापूर येथे झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये दाखल झाले. त्यांनी १९४५ मध्ये बी. ए. आणि १९४९ मध्ये बी. टी. या पदव्या संपादन केल्या. इस्लामपूर येथे मित्रांच्या सहकार्याने शिकत असतानाच त्यांनी ‘श्रीराम समाजसेवा मंडळ’ स्थापन केले. त्यामार्फत त्यांनी ठिकठिकाणी पंधरा प्राथमिक शाळा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भावी शिक्षणप्रसाराच्या कार्याचे हे बीजारोपण होते. २५ डिसेंबर १९४० रोजी बेळगावचे नानासाहेब पाटील यांच्या कन्या सुशीला यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुलगे व एक मुलगी आहे. मह...
Comments
Post a Comment