1 ऑक्टोबर 2022 दिनविशेष
- १ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह
महत्त्वाच्या घटना:
१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू
१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१८६९: साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला.
१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना
१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.
१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.
२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८४७: अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)
१८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)
१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)
१९१९: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)
Comments
Post a Comment