24 सप्टेंबर दिनविशेष

१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.

१९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली.

१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.

१९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण

१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

१९९०: साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.

१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.

१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली ‘टी २० विश्वकरंडक’ जिंकला.

२००९: साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.

२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

१५५१: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत – प्रचंड कवी (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

१८५६: साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्मदिन.

१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१८८९: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)

१८९८: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

फटाके की पुस्तके निवडायची

23 सप्टेंबर दिनविशेष