Thursday, September 29, 2022

30 संप्टेबर दिनविशेष

३० सप्टेंबर : दिनविशेष – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

३० सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला
  • १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली
  • १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले
  • १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले
  • १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
  • १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.
  • १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
  • १९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.
  • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.
  • १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
  • २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.
        ३० सप्टेंबर– जन्म
१२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)
१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)
१९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)
१९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)
१९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)
१९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.
१९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.
१९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.
१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.
१९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.
१९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)
१९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.
१९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.
१९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म
३० सप्टेंबर– मृत्यू

१२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.
१६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८)

१९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)

१९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

१९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

२००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

Tuesday, September 27, 2022

२८ सप्टेंबर : दिनविशेष –

२८ सप्टेंबर : दिनविशेष – जागतिक रेबीज दिन / आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन / आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन

२८ सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

    १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

    १९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

    १९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

    १९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

    १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

    १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

    २०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

    २००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

    २००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

२८ सप्टेंबर– जन्म

१८०३: फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०

१८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म

१८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म

१९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १

१९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म

९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म

१९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म

१९४७: बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म

१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म

१९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म

१९८२: चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म

२८ सप्टेंबर– मृत्यू

१८९५: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर 

१९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०

१९५३: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १८८

१९५६: बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८८

१९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निध

१९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निध

१९८९: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१

१९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निध

१९९२: पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निध

 २०१२: चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.

Friday, September 23, 2022

24 सप्टेंबर दिनविशेष

१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.

१९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली.

१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.

१९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण

१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

१९९०: साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.

१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.

१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली ‘टी २० विश्वकरंडक’ जिंकला.

२००९: साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.

२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

१५५१: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत – प्रचंड कवी (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

१८५६: साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्मदिन.

१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१८८९: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)

१८९८: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

Thursday, September 22, 2022

23 सप्टेंबर दिनविशेष

23  सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
१८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
१९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
१९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
२००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
23 September's Birthday
१२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)
१७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.
१८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)
१९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)
१९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)
१९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.
१९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.
१९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.
१९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)
१९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)
१९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७
१९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म
१९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
१९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.
१९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

 

Thursday, September 30, 2021

लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री






(२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान (९ जून १९६४-११ जानेवारी १९६६). त्यांचे आडनाव श्रीवास्तव, पण त्यांनी या आडनावाचा व्यवहारात कधीही उपयोग केल्याचे आढळत नाही. त्यांचा जन्म बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद व रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात झाला. वडील शारदाप्रसाद सुरूवातीस प्राथमिक शिक्षक होते; पुढे ते शासकीय लिपिक झाले. आई पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या होत्या. लालबहादूर दीड वर्षाचे असताना वडील वारले. तेव्हा हे कुटुंब बनारसजवळ रामनगरला स्थायिक झाले.

हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व म. गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले. पुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले. त्यांनी महत् कष्टाने काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५).

विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकांचा आणि नंतर पुरुषोत्तमदास टंडन व लाला लजपत राय यांच्या त्यांच्यावर प्रभाव पडला. लाला लजपत राय यांनी स्थापिलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या संस्थेचे ते १९२५-२६ मध्ये आजीव सेवक झाले आणि अलाहाबादेत त्यांनी कायमचे वास्तव्य केले.

मिर्झापूर येथील ललितादेवींशी त्यांचा १९२७ मध्ये विवाह झाला. त्यांना चार मुलगे व दोन मुली झाल्या. त्यांचे दोन मुलगे पुढे सक्रिय राजकारणात आले. पत्नी ललितादेवी धार्मिक वृत्तीच्या असून उपासना व पतीची सेवा यात मग्न असत. काही दिवस मुझफरपूर येथे त्यांनी हरिजनोद्वाराचे कार्य केले. अलाहाबादला नेहरूंचे मार्गदर्शन व सहवास त्यांना लाभला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील संघटनांतून बहुविध पदांवर काम केले. त्यांत प्रयाग नगरपालिकेचे सदस्य (१९२८-३५), उत्तर प्रदेश विधान सभेचे सदस्य, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव (१९३७), भूमि-सुधार समितीचे चिटणीस (१९३५-३६), जिल्हा काँग्रेसचे चिटणीस (१९३०-३५), प्रांतिक काँग्रेसचे चिटणीस (१९३७), अ.भा.काँ.

कार्यकारिणीचे सदस्य व महासचिव इ. पदे भूषविली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना सात वेळा अटक होऊन नऊ वर्षे कारावास भोगावा लागला. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून त्यांनी कार्य केले; पण पुढे त्यांना अटक झाली. तुरुंगात त्यांनी कांट, हेगेल, रसेल, हक्स्ली इ. विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले. मादाम क्यूरीच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. त्यांचे काही स्फुटलेख अप्रकाशित राहिले आहेत. त्यांनी काही महिने उत्तर प्रदेशाच्या इंटरमीजिएट बोर्डावर तसेच हिंदी समितीचे संयोजक म्हणूनही काम केले.

त्तर प्रदेश विधान सभेवर ते काँग्रेसतर्फे १९४६ मध्ये निवडून आले. गोविंद पंतांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृह आणि दळणवळण खाते देण्यात आले. पंडित नेहरूंनी त्यांना अ. भा. काँग्रेसचे महासचिव केले(१९५०). भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीचे कठीण काम केले. त्यांची समन्वयवादी वृत्ती व संघटनकौशल्य लक्षात घेऊन पंडित नेहरूंनी त्यांना राज्यसभेचे सभासद करून केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि वाहतूक खात्याचे मंत्री केले. त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या उतारूंसाठी अनेक सुखसोयी उपलब्ध करून देऊन गंगा नदीवर मोठा पूल बांधला (१९५५). प. बंगालमध्ये चित्तरंजन कारखान्याची उभारणी केली. यावेळी केरळमध्ये घडलेल्या अरियालूरच्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आदर्श घालून दिला (१९५६).

त्यानंतर ते १९५७ मध्ये पून्हा लोकसभेवर निवडून आले. त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. १९५७ ते १९६४ दरम्यान त्यांनी संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इ. खाती समर्थपणे सांभाळली; विशेषतः गृहमंत्रिपदाच्या काळात पंजाबी सुभ्याची चळवळ, दक्षिणेतील हिंदी विरोधी चळवळ, जम्मू-काश्मीरमधील धार्मिक तणाव यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. लाचलुचपत आणि भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी त्यांनी संथानम् आयोगाची नेमणूक केली. त्यांनी विशाखापट्टनम् येथे जहाजबांधणी कारखान्याची उभारणी केली, रशिया व चेकोस्लोव्हाकिया यांच्या सहकार्याने अवजड अभियांत्रिकी निगम स्थापन केला आणि चाळीस परकीय संस्थांशी व्यापारी करार केले.

आसामची भाषिक दंगल (१९६०-६१), पंजाबची धार्मिक दंगल आणि मास्टर तारासिंगांची पंजाबी सुभ्याची चळवळ हे प्रादेशिक प्रश्न त्यांनी अत्यंत कौशल्याने व कणखर भूमिका घेऊन हाताळले. द्रविड मुन्नेत्र कळघम्‌च्या स्वतंत्र द्रविडस्तानच्या मागणीचा त्यांनी इन्कार केला आणि भारतीय संघातून बाहेर पडणाऱ्या प्रचारयंत्रणेस राष्ट्रद्रोही ठरवून तसे विधेयक संसदेत संमत करवून घेतले (१९६३). तसेच केंद्रीय प्रशासनातील दप्तर दिरंगाईवर कडक उपाययोजना केली.

जवाहरलाल नेहरूंनी प्रशासनाच्या शुद्धीकरणासाठी कामराज योजना अंमलात आणून डोईजड सहकाऱ्यांना राजीनाम्याचे आवाहन केले. कामराज योजनेनुसार शास्त्रींसह सहा मंत्र्यांनी राजीनामे दिले. शास्त्रींनी काँग्रेस संघटनेच्या कामास वाहून घेतले; पण पंडितजींनी पुन्हा त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून घेतले. पंडित नेहरूंच्या निधनानंतर (२७ मे १९६४) काँग्रेसच्या संसदीय सभेने ९ जून १९६४ रोजी शास्त्रींची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केली.

नंतर लगेचच त्यांनी पंजाबचे प्रतापसिंग कैराँ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दास कमिशन नियुक्त केले; भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बदनाम झालेले ओरिसाचे वीरेन मित्र आणि बिजू पटनाईक यांना राजीनामा द्यावयास भाग पाडले; तसेच केरळातील अस्थिर वातावरण पाहून तिथे राष्ट्रपती राजवट आणली (१९६५).

भारताचे शांतता आणि अलिप्तता या तत्त्वांवर आधारित परराष्ट्रधोरण पुढे चालू ठेवले. श्रीलंका, भूतान, नेपाळ यांसारख्या शेजारी देशांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्याशी असलेली मैत्री दृढ करण्यावर भर दिला. भारत श्रीलंका यांत करार करून सु. चार लाख भारतीय तमिळांना श्रीलंकेचे नागरिकत्व मिळवून दिले. शेख अब्दुल्लांना त्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांमुळे स्थानबद्ध केले. त्याचप्रमाणे नेहरूंचे औद्योगिक प्रगतीचे धोरणही त्यांनी पुढे चालू ठेवले.

त्यांच्या कारकीर्दीतील भारत-पाक युद्ध ही सर्वांत कसोटीची घटना होय. ती त्यांनी अत्यंत खंबीरपणे व कार्यक्षमतेने हाताळली. पाकिस्तानकडूनच १२ एप्रिल १९६५ रोजी कांजरकोट येथे कच्छ सरहद्दीवर प्रथम छाड बेटावर आक्रमण झाले, तेव्हा शास्त्रीजींनी प्रतिकाराची घोषणा केली आणि आणि मॉस्को येथे कोसिजिन आणि मिकोयान यांच्याशी तत्संबंधी सविस्तर चर्चा केली. याचवेळी त्यांनी जिनीव्हा करारानुसार व्हिएटनामी युद्ध अमेरिकेने तत्काळ थांबवावे, अशी जोरदार मागणी केली आणि अमेरिकेने दिलेले भेटीचे निमंत्रण पुढे ढकलताच,  ‘माझा दौराच रद्द करा’ असे स्पष्ट कळविले. त्यांनतर काही दिवसांनी १४ ऑगस्ट १९६५ रोजी पाकिस्तानने सियालकोट येथे युद्धबंदीरेषा ओलांडून अतिक्रमण केले.

तेव्हा भारतानेही रिथवाल येथे युद्धबंदीरेषा ओलांडून हाजीपीर जिंकले आणि लाहोरच्या परिसरात भारतीय फौजा घुसल्या (६ सप्टेंबर १९६५). पाक आक्रमणाला प्रतिआक्रमणाने उत्तर देऊन त्यांनी भारताच्या इतिहासात प्रथमच आक्रमक शत्रूच्या प्रदेशांत घुसून लढाई करण्याचा मान मिळविला. युद्धकाळात त्यांनी जनतेला सहकार्याचे आवाहन केले. सियालकोट, जम्मू, आदमपूर, जोधपूर इ. रणक्षेत्रांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली व जेव्हा चीनने युद्धाची धमकी दिली, तेव्हा दोन्ही आघाड्यांवर लढण्यास भारत सज्ज असल्याची आत्मविश्वासपूर्वक घोषणा केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने युद्धविरामाची विनंती करताच एकतर्फी युद्ध थांबवून वाटाघाटीस तयारी दर्शविली.

भारत-पाक यांत रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंदला वाटाघाटी होऊन नऊ कलमी ⇨ताश्कंद करारावर आयुबखान व शास्त्री यांच्या १० जानेवारी १९६६ रोजी सह्या झाल्या. त्या मध्यरात्रीच शास्त्रींचे हृदयविकाराने निधन झाले. लालबहादूरांनी कधी कुणाची नोकरी अशी केली नाही, पण अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांत विनावेतन किंवा गरजेपुरता अल्प मोबदला घेऊन काम केले. त्यामुळे अखेरपर्यंत त्यांना दारिद्र्याशी झगडावे लागले. त्यांचा मूळ पिंड शांततावादी समाजसेवकाचा होता. संघटनकौशल्य हा त्यांचा स्थायी भाव होता.

उजवे व डावे त्यांच्या समन्वयवादी भूमिकेमुळे विधायक कार्यासाठी एकत्र येत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सत्‌शील व निरिच्छ वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे अनेकांचा त्यांनी विश्वास संपादिला. भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि कणखर धोरणाचे दर्शन जगाला घडले. त्यांची जय जवान, जय किसान ही अर्थपूर्ण घोषणा पुढे अमर झाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष व थोर देशभक्त पुरुषोत्तमदास टंडन यांनी त्यांच्या कार्याचे मूल्यमापन पुढील शब्दांत केले आहे. ‘मूल्यमापन करणे, अडचणीतून मार्ग काढणे व समेट घडवून आणणे यांत शास्त्रीजींचा हातखंडा आहे. या गोष्टी ते मृदुतेने पार पाडीत, पण त्यांच्या या मार्दवामागे खंबीरपणाचा पहाड उभा आहे, हे विसरून चालणार नाही’. भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला. त्यांच्या स्मरणार्थ तामिळनाडू राज्यात संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे (१९९१).

 

माय मराठी  विषय - मायबोली  माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...