बालमानसशास्त्र



1)बाल केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालील पैकी कोणी केला आहे?
1) एरिक एरिकसन
2) जॉन ड्युई  √
3) बी एफ स्किनर
4)थोर्नडाइक

2) खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही?
1) संवेदनक्षमता
2) प्रवाहीतता
3) लवचिकता
4) रूढीबद्धता  √

3) बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते?
1) संस्कृती व प्रशिक्षण  √
2) भावना
3) अभिवृत्ती
4) बालकाचे ध्येय

4) बालकाचा शारीरिक ,मानसिक ,भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो?
1) शैशवावस्था
2) बाल्यावस्था
3) कुमारावस्था
4) प्रौढावस्था   √

5) बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली?
1)16व्या
2)17 व्या
3)18 व्या
4)20 व्या   √

6) वाढ ही संकल्पना कशा प्रकारची आहे ?
1) संख्यात्मक √
2) गुणात्मक
3) अंशतः संख्यात्मक व  अंशतः गुणात्मक
4) पूर्णतः गुणात्मक

7) विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे?
1) व्यक्तिमत्व
2) बुद्धिमत्ता
3) वाढ  √
4) संवेदन

8) बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते?
1) वातावरण
2) फक्त माता कडून
3) फक्त पिता कडून
4) माता व पित्याकडून कडून  √

9) ब्रुनरच्या अध्ययन विषयक उपपत्तीवर कोणत्या मानसशास्त्रज्ञांच्या विचारांचा प्रभाव आहे?
1) पियाजे  √
2) कोहलर
3) थॉर्नडाईक
4) वॅटसन


10)श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे?
1) डेव्हिड आसूबेल
2) रॉबर्ट गॅगने   √
3) जीन पियाजे
4) जेरोम ब्रूनर

11) अल्फ्रेड बिने हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत? 
1)व्यक्तिमत्व
2)अध्यापन
3) अध्ययन
4)बुद्धिमापन√

12) बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आहे?
1)थॉर्नडाईक
2) स्पियरमन
3) बिने
4)थर्स्टन  √

13) पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहेत ?
1)संख्यात्मक श्रेणी 
2)आरेखित श्रेणी
3)कोटी श्रेणी  
4)वरील सर्व  √

14) अभिक्षमता म्हणजे काय? 1)बालकांमधील विशेष भावना 2)बालकांमधील विशेष कौशल्य विषयक क्षमता   √
3) बालकातील विश्वास 4)बालकातील अभिरुचीचा एक प्रकार

15) खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशिलतेवर अधिक भर देते ?
1)प्रायोगिक पद्धती 
2)प्रकल्प पद्धती
3) क्रीडा पद्धती
4) वरील सर्व    √

Comments

Popular posts from this blog

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

फटाके की पुस्तके निवडायची

विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम September 15, 2020