बालमानसशास्त्र संभाव्य प्रश्न
बालमानसशास्त्र संभाव्य प्रश्न*
*1) समस्येचे स्वरूप जाणून घेणे, सध्याच्या परिस्थितीतील उणीव जाणून नवीन मार्ग शोधणे ही वैशिष्ट्ये कोणत्या बालकाची असतात ?*
1)सामान्य बालक
2) प्रज्ञावान बालक
3) सर्जनशील बालक। √
4) अध्ययन अकार्यक्षम बालक
*2) बालकाचे मानसिक वय ठरविण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग केला जातो?* 1)शालेय परीक्षा
2) बुद्धिमापन चाचणी √
3)अभिरुची चाचण्या 4)अभिवृत्ती चाचणी
*3) विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या बदलांचा समावेश होतो?*
1) संख्यात्मक
2) गुणात्मक
3) गुणात्मक व परिणामात्मक√ 4)शारिरिक वाढीत्मक
*4) व्यक्तीचे आचार ,विचार, भावना, ज्यातून कळतात त्यास गिलफोर्ड कोणता आशय म्हणतात?*
1)स्मृति आशय
2) सांकेतिक आशय
3) आकृती विषयक आशय
4) वर्तनविषयक आशय √
*5)अब्राहम मॉस्लोने*
*व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून केला?* 1)मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन 2)मानवतावादी दृष्टिकोन √ 3)वर्तनवादी दृष्टिकोन
4) रचनावादी दृष्टिकोन
*6) खालीलपैकी कोणती ग्रंथी भावनांवर नियंत्रण ठेवते ?*
1)वृक्कस्थ ग्रंथी √
2)कंठस्थ ग्रंथी
3)लिंग ग्रंथी
4)मस्तिष्क ग्रंथी
*7) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*
1) 10 डिसेंबर
2)17 डिसेंबर
3)5 जून
4)3 डिसेंबर √
*8) बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतीबंधास जीन पियाजे काय म्हणतो?*
1) अवबोध
2) संवेदन
3)मानसिक तनाव
4)बोधात्मक रचना √
*9) व्यक्तीची श्रवणक्षमता कोणत्या एककात मोजतात?* 1)मिलियन
2)गॅलियन
3) डेसिबल √
4)हर्ट्झ
*10) शिक्षक अध्यापन करताना विशिष्ट कडून सामान्याकडे घेऊन जात असतील तर ते अध्यापनाची कोणती पद्धती वापरत आहे?* 1)अवगामी पद्धती
2)उदगामी पद्धती √
3)प्रायोगिक पद्धती
4)प्रकल्प पद्धती
*संदर्भ- © संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स,पुणे*
*11) होकारात्मक व नकारात्मक उदाहरणांचा वापर कोणत्या प्रतिमांनामध्ये केला जातो?*
1)पृच्छा प्रशिक्षण
2)अग्रत संघटन
3)संकल्पना प्राप्ती √
4)उदगामी विचार
*12) बालकांनी अगोदर शिकलेले कौशल्य व नवीन कौशल्य यांच्यात एकसारखेपणा असल्यास त्याचा कोणता परिणाम होतो ?*
1) ऋण संक्रमण
2) सामान्यीकरण संक्रमण
3) धन संक्रमण। √
4)शून्य संक्रमण
*13) मर्मदृष्टी अध्ययनाचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर करण्यात आला?*
1)चिंपांझी माकड। √
2) मांजर
3)कुत्रा
4)कबूतर
*14) मानसिक वय या संकल्पनेची मांडणी करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते?* 1)स्किनर
2)गिलफर्ड
3) अल्फ्रेड बिने √
4)टर्मन
*15) व्यक्तिमत्वाच्या अबोध मनाचा शोध घेण्यासाठी फ्रॉइडने कोणत्या पद्धतीचा वापर केला?*
1)मुलाखत
2) प्रश्नावली
3) मुक्त साहचर्य √
4) अभिरुची शोधिका
*16) बालकांमधील व्यक्तीभेदांचे मापन करण्यासाठी कोणत्या चाचण्या उपयुक्त ठरतात?* 1)बुद्धिमापन चाचणी
2) अभिरुची शोधिका 3)अभिक्षमता चाचणी
4) वरील सर्व √
*17) गणितातील मूलभूत क्रिया कृतिशीलरित्या शिकण्यासाठी अंध मुलांसाठी उपयुक्त साधन कोणते ?*
1)रबर मॅट √
2)हस्ताक्षर मार्गदर्शिका
3)ब्रेल मशीन
4)अबॅकस
*18) लेव व्यागोटस्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो?*
1)सामाजिक प्रक्रिया
2) सांस्कृतिक संदर्भ
3) भाषा व खेळ
4)वरील सर्व√
*19) विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययन कृतीची प्रशंसा करून त्यास प्रोत्साहन देणे यास कोणते कौशल्य म्हणतात?*
1) प्रश्न
2) प्रबलन √
3) स्पष्टीकरण
4) प्रस्तावना
*20) संप्रेषण प्रक्रियेत विविध कारणांनी बाधा येणे यास काय म्हणतात?*
1)प्रतिक्रिया
2)गोंधळ √
3) पुनर्भरण
4)निः संकेतीकरण
*21) विद्यार्थ्यांमधील* *सर्जनशीलता ,विचारांची* *अभिव्यक्ती यांना कोणत्या प्रश्न*प्रकारातून वाव* मिळतो*
1)लघुत्तरी प्रश्न
2) वस्तुनिष्ठ प्रश्न
3) निबंधात्मक प्रश्न √
4)प्रत्यभिज्ञान
*संदर्भ- © संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स,पुणे*
Comments
Post a Comment