1 ऑक्टोबर 2022 दिनविशेष
१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह महत्त्वाच्या घटना: १७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले. १८६९: साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला. १८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला. १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना १९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला. १९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली. १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली. १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले. १९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले. १९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले. १९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले. २००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारत...